डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की उठा शिक्षण घ्या, संघटित व्हा,संघर्ष करा असं वाक्य नेहमी म्हणत होते त्याचाच एक भाग म्हणून सेवाभावे प्रतिष्ठान, तळोदा तर्फे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त या बोरवाण गावात परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गायमुखी,टाकळी,खर्डी, बोरवण या गावातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी श्री अंबरसिंग दिवाकर ठाकरे होते. या कार्यक्रमाला सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे हे होते. प्रमुख पाहुणे एडवोकेट श्री.गणपत पाडवी हे होते बोरवण गावाचे पोलीस पाटील श्री.कृष्णा सायसिंग ठाकरे होते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व देव मोगरा माता यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री.भास्कर वेंदे सर यांनी केले. प्रस्तावना राजेंद्र वाईकर सरांनी केली.

अॅड श्री.गणपत ठाकरे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे शिक्षणासाठी संघर्ष केला त्यांनी आपल्यासाठी संविधानात शिक्षण घेण्याचे कायदे करून दिले आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे व सेवाभावे प्रतिष्ठान जो काय हा कार्यक्रम घडवून आणला शैक्षणिक साहित्य दिले याचे विद्यार्थ्यांना खूप शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन भेटेल.

सेवाभावे प्रतिष्ठान चे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे म्हणाले, डॉ.बाबासाहेबांचे विचार तळ्यात गळ्यात पोहोचले पाहिजेल त्यांनी दिलेला संदेश हा अंमलात आणला गेला पाहिजे. महापरिनिर्वाण दिना निमित्ताने सेवाभावे प्रतिष्ठान या चिमुकल्या सोबत शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला.

या कार्यक्रमासाठी सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी उपाध्यक्ष सागर पाटील संचालक नकुल दित्या ठाकरे श्री.अतुल भिमसिंग पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी खर्डी जि परिषद मुख्याध्यापक श्री.भापकर जगत वेंदे,बोरवन जि परिषद मुख्याध्यापक श्री.राजेंद्र गोविंद वसईकर,टाकळी जि परिषद मुख्याध्यापक श्री प्रवीण भुरणसिंग गोसावी,श्री दिनेश भिका सोनवणे श्री नवलसिंग ओमना वळवी राणीपूर,सौ.प्रतिभा कृष्णराव भामरे सौ.गीता मॅडम उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार टाकळी गावाचे जि परिषद मुख्याध्यापक श्री.प्रवीण गोसावी सर यांनी केले

jalgaonsandesh

jalgaonsandesh