वराडसिम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील वराडसिम गावात मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी केली गेली . त्यात सर्व प्रथम ग्रूप ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय जयंती साजरी केली. ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दीपप्रज्वलन केले. महिला सरपंच भारती विनोद पचरवाल उप सरपंच ज्योत्स्ना विलास पाटील आणि ग्रा.प.सदस्या प्रिती संजय ढाके सह बचत गटाच्या महिला पदाधिकारी संगिता शरद सोनवणे, योगिता राजेंद्र भारंबे,सोनाली संजय पाचपांडे इत्यादी महीला ब्रिगेड ने या स्री उध्दारक महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्या वेळेस उपस्थित ग्रा.प.सदस्य निव्रूत्ती मावळे ,सुभाष कोळी ,रोजगार सेवक केलास कोळी ,व ग्रामस्थ ,भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते बापूराव साहेबराव सोनवणे आणि अक्षय संतोष सपकाळे यांनी महामानवांनी भारतीयांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकून स्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूकोड बील ओबीसी साठीची 340 कलम आदींची माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता झाली. त्याच प्रमाणे युनिटी क्लब तर्फे शहिद प्रकाश जुलालसिंग पाटील सभागृहात अध्यक्ष प्रकाश ठाकूर , उपाध्यक्ष रवि पारधी , तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh