दिवाळी आली आणी पुन्हा नवा उत्साह घेऊन आली!

प्रतिनिधी – गोपाल पाटील

ममुराबाद – दिवाळी म्हंटल की हा सन आपण साधारण दसऱ्या नंतर 20 दिवसानी येणारा हा सन असतो हिंदू धर्मानुसार राम वनवासातून आपल्या राज्यात म्हणजेच अयोध्या मध्ये परत आल्यावर संपूर्ण अयोध्या मध्ये दीप प्रज्वलित करून रामाचे स्वागत केले म्हणून हा सन संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येकामध्ये एक उत्साह या सणाचा दिसून येतो, तसेंच लहान मुलांमध्ये एक नवीनच आनंद दिसून येतो. सुट्या आणि बरच काही त्यातच लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बांधणीची एक परंपरा सतत चालत आलेली आहे.

पूर्वी मित्रांच्या घोळक्याने एकत्र येऊन माती आणायची आणि मातीचे लिंपण करून मेहनतीने साकारलेला किल्ला सजवायचा. दिवाळीत किल्ल्यावर पणत्यांची आरास केली जात असे. हा आनंद आताच्या पिढीसाठी दुर्मीळ झाला आहे.  पण ग्रामीण भागातील मुलांनी ती जपून ठेवलेली दिसून येते,  ममुराबाद गावातील खंडेराव नगर मधील लहान मुलांनी हुबेहूब तोरणा किल्ला मातीपासून तयार केलेला आहे. त्यामध्ये, भावेश धनगर, चेतन पाटील, भूषण कोळी, दादू लोहार,उदय पाटील व मार्गदर्शक वैभव पाटील, कल्पेश कोळी, योगेश वाघोडे, गोपाल पाटील हे होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh