दिव्यांग, वयोश्री साहित्य वितरीत करण्यास विलंब केल्यामुळे गंजलेल्या साहित्याचे नुकसान सबंधित अधिकारी यांच्याकडून वसुल करून दिव्यांग दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कठोर कार्यवाहि करून नवीन साहित्य देण्यात यावे-चंपतराव डाकोरे पाटील

प्रतिनिधी,

नांदेड-:जिल्हाअधिकारी साहेब,नांदेड मार्फत मा.मुख्यमंत्री, राज्यपाल
उपमुख्यमंत्री,समाजकल्यण न्यायमंञी साहेब,बच्चुभाऊकडू मुख्य सचिव साहेब, दिव्यांग आयुक्त साहेब पुणे यांना दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखाली नांदेड जिल्हाअधिकारी,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन मुख्यमंत्री, संबधित मंत्र्याना निवेदन देऊन नांदेड जिल्ह्यातील सोळाहि तालुक्यात 2019 मध्ये दिव्यांग,वयोश्री पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीर घेऊन त्यांचे साहित्य प्रशासनाच्या हलगर्जीमुळे वाटप न केल्यामुळे गंजुन गेल्यामुळे दिव्यांग,वृध्दाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकारी यांची चौकशी करून त्या गंजलेल्या लाखो रू खर्चाची वसुली करुन नविन साहित्य देण्याबदल निवेदन देण्यात आले.
नांदेड जिल्हयातील सोळाहि तालुक्यात वरीष्ठ अधिकारी यांना दिलेले निवेदन खालिल प्रमाणे
1) दिव्याग,वयोश्री साहित्य वाटप व्हावे म्हणुन सोळाहि गटविकास अधिकारी,तहसिलदार यांना निवेदन दि.14 फ्रेबु 2022 ते 5 मार्च 2022 वाटप न करण्याचे उतर दि.9 मार्च 2022 देण्याची विंनती प्रत्यक्ष भेटुन साधे उतर मिळाले नाहि.
2) दिव्यांग वयोश्री साहित्याबदल दिव्यांग तक्रार कक्ष प्रमुखामार्फत वरीष्ठ अधिकारी निवेदन दि 11 मार्च. 2022
3) मा.मुख्यमंत्री,संबधित मंत्री निवेदन मार्फत जिल्हाअधिकारी नांदेड दि.22 मार्च 2022

4). मा.मुख्यमंत्री,संबधित मंत्री निवेदन मार्फत जिल्हाअधिकारी नांदेड दि.29,30मार्च दोन दिवस धरने आंदोलन ,मोर्चा दि.30 मार्च 2022
5.) सर्व गटविकास अधिकारी यांना दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी ऊपमुख्यकार्यकारी जि.प.नांदेड यांनी दि 5 मे.2022 रोजी आदेशित केले.
6) सर्व गटविकास अधिकारी यांना ऊपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जि.प.नांदेड यांनी दि 11 मे.2022 आदेशित केले.दि. 9 जुन 2022 स्मरणपत्र देऊन सुध्दा साधे वरीष्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली साधे ऊतर नाहि
7) सर्व खातेप्रमीखाची बैठक दि.8 जुन 22रोजी मा.ऊपमुख्य कार्यकारी पंचायत जि.प नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन न्याय मिळाला नाहि.
8) नांदेड जिल्ह्यातील सोळाहि गटविकास अधिकारी,तहसिलदार यांना निवेदन 25 मे.2022 ते 30 जुन 2022 पर्यंत देऊन सुध्दा साधे उतर नाहि.
9) मा.मुख्यमंत्री,संबधित मंत्री निवेदन मार्फत जिल्हाअधिकारी नांदेड दि.30 ऑगस्ट 2022
10) मा.मुख्यमंत्री,संबधित मंत्री निवेदन मार्फत दिव्यांग आयुक्त पुणे निषेध आंदोलन दि.14 सप्टे.2022
11) दिव्यांग आयुक्त पुणे यांचे मा.मुख्यकार्यकारी,अधिकारी
जिल्हाअधिकारी साहेबाना दि.19 सप्टे.2022 रोजी आदेशित करून सूध्दा दिव्यांग,वयोश्री साहित्य वाटप झाले नाहि वरीष्ठाच्या व संघटनेच्या निवेदन,आंदोलनाला केराची टोपली दाखविणाऱ्या दिव्यांगाना हक्कापासुन वंचीत ठेवणाऱ्या संबधित अधिकारि,यांच्यावर दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे योग्य ते कार्यवाहि करून साहित्याची लोखो रूपयाची वसुली करून दिव्यांगाना साहित्य त्वरीत वाटप दि.10 नोव्हे 2022 पर्यत करावे नाहि झाल्यास दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ नांदेड यांच्या वतीने अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा ईशारा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,सागर पंडीत,सचिन कुंटुरवार,शेख मुस्ताक,बरिदे सखाराम,शिवकुमार काळे,दाढे महानंदा,रामेश्वर बंडेवार,बलविंदर कौर,सविता गच्चे,तेजपालसिंघ ईत्यादी कार्यकर्ते ऊपस्थित होते.

ताजा खबरें