दिव्यांग सेनेच्या आंदोलनाला यश

जळगाव – जिल्ह्यातील दिव्यांग बांधवानच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रसाद साळवी सर यांच्या आदेशानुसार दिव्यांग सेना राष्ट्रीय सचिव भरत जाधव व दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन जळगाव यांच्या नेतृत्वात महानगर पालिका जळगाव शहर येथे फेब्रुवारी महिन्या मध्ये आमरण उपोषण करण्यात आले होते.या आधी दिव्यांग सेनेच्या माध्यमातून वारंवार निवेदन देऊन सुध्दा प्रशासनाने ठोस पावले उचली नव्हती, जळगाव शहर महानगर पालिका शहरातील दिव्यांग बांधव त्यांच्या हक्काचा ५ % दिव्यांग कल्याणकारी निधी पासून वंचित राहत होते.

दिव्यांग सेना जळगाव यांनी महानगर पालिके समोर आमरण उपोषण करून दिव्यांग बांधवाना न्याय मिळवून देऊन आज एकूण ₹ ७५ लाख, ६३० दिव्यांग बांधवानच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹ १२,०००/- वर्ग करण्यात आले महानगर पालिका जळगाव यांच्या कडे एकूण १४०० दिव्यांग बांधवान ची नाव नोंदणी आहे तरी उर्वरित दिव्यांग बांधवाना नंतर निधी देण्यात येईल, महानगर पालिका आयुक्त यांचे आभार उपाध्यक्ष शेख शकील,सचिव हितेश तायडे,जिल्हा सल्लगार राहुल कोल्हे, सचिव ज्ञानेश्वर पाटील, महिला महानगर अध्यक्ष मिनाक्षी साठे, मूकबधीर अध्यक्ष तोसीफ शाहा, मूकबधीर अध्यक्ष मुजाहीद पिंजारी संघटक प्रमुख प्रदीप चव्हाण, यावल ता अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, एरंडोल ता अध्यक्ष भारत पाटील यांनी मानले

 

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh