जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम साठी जात असताना भुसावळ शहराच्या बाहेर एक जखमी अवस्थे मधील गाढव दिसून आले होते,

वृक्षारोपण मोहीम आटोपून परतत असताना, ते गाढव त्याच जागी आढळून आले, त्याला जखमी असल्याने हालचाल करता येत नसल्याचे लक्षात आले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांनी गाडीतून उतरून निरीक्षण केल्याच्या नंतर त्यांना गाढव जखमी असल्याचं लक्षात आले असता

तातडीने त्यांनी शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या पथकाला माहिती देत, या जखमी गाढवावर उपचार करण्याचे सूचित केले, आणि काही वेळातच या गाढवावर उपचार सुरू झाले आहेत. गाढव प्राणी म्हटलं की त्याला कोणतीच भावना नाही की प्रतिष्ठा नाही, उलट गाढव म्हटल की त्याची हेटाळणी केली जाते.

मात्र कोणताही उपद्रव नसलेला हा प्राणी अतिशय कष्ट करी तर आहेत,शिवाय अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधे तो माणसाचा मदतीला नेहमीच धाऊन आला आहे.

या सगळ्याची जाणीव ठेवणारे जळगाव चे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद साहेब यांनी नेहमीच आपल्या संवेदनशील पणाचा प्रत्यय दिला आहे, मग कुत्रा असो की गाय असो गाढव असो की मांजर असो  कोणत्याही जीवाचे मोल हे अनमोल आहे आणि त्या जीवाच्या रक्षणा साठी आपण धाऊन जायला पाहिजे याचा आदर्शच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी आज गाढवावर उपचार करून घालून दिला आहे. त्यांच्या या संवेदनशीलता बाबत काय बोलावे असा प्रश्न पडतो, त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे बोलले जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh