ग.स.संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांना सन्मान निधीचे वितरण..

चोपडा – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) संस्थेच्या ज्येष्ठ सभासद सन्मान निधी योजनेअंतर्गत चोपडा नं.१ ते ५ शाखेतर्फे सभासद होऊन २५ व ३० वर्षे झालेल्या एकुण ११० जेष्ठ सभासदांना अनुक्रमे रू.५००१ व रू.७००१ मात्रच्या सन्माननिधीचे धनादेश वितरण करण्यात आले. मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, माजी गटविकास अधिकारी हिराबाई जाधव, जळगाव माध्यमिक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आर.एच. बाविस्कर, माजी मुख्याध्यापक मधुकर बाविस्कर, माजी संचालक देवेंद्र पाटील, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, विद्यमान संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर, चोपडा कॉलेजचे प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा कर्मचाऱ्यांच्या हस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकात संचालक योगेश सनेर यांनी संस्थेच्या विविध योजनांबद्दलची विस्तृत माहिती दिली. तसेच केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, सुनील चौधरी, जगदीश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या ध्येयधोरणांबाबत गौरवोद्गार काढले. याप्रसंगी ग.स.च्या ज्येष्ठ सभासदांची विशेष उपस्थिती होती.

सूत्रसंचलन विवेकानंद विद्यालयाचे उपशिक्षक राधे:श्याम पाटील तर आभार प्रदर्शन कै.हि.मो.करोडपती विद्यालयाचे मुख्या. मंगेश भोईटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी, शाखाधिकारी यांचेसह सर्वच कर्मचारी बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

ताजा खबरें