महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची चर्चा !तर नांदेड जिल्हा भोकर मध्ये इंजि. विश्वंभर पवार यांची चर्चा!

भोकर – येथील अजित दादा पवार गटाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश मेळावा दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजता गणराज रिसॉर्ट नांदेड रोड येथे आयोजित केला होता या मेळाव्यात भोकर शहरास ग्रामीण भागातील इतर पक्षातील व सामाजिक कार्य करणारे नवयुवक अनेकांनी या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित दादा पवार गट राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला या मेळाव्याला संबंधित करताना इंजिनिअर विश्वंभर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या कार्याची पद्धत पाहून अनेक नवयुवक आमच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद देऊन पुढील राजकीय वाटचालीस त्यांना शुभेच्छा देऊन पक्षांमध्ये योग्य तो न्याय दिला जाईल सर्व समाज घटकातील सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो न्याय दिला जाईल असे यावेळी आपल्या मनोगत व्यक्त केले यावेळी भोकर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेश देशमुख यांनी आपल्या सर्व समर्थकासन राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष वसंत सुगावे ज्येष्ठ नेते जीवन पाटील घोगरे नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष इंजीनियर विश्वंभर पवार सह ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते या पक्ष प्रवेश मिळाव्यात शेकडो कार्यकर्ते राजू देशमुख सह राजेश देशमुख यांच्यासह माधवराव देशमुख, चेअरमेन सोसायटी भोकर, आनंद उत्तमराव पाटील जाधव युवा सेना भोकरचे अध्यक्ष, नवीन रेडी युवा नेते किनी, गणेशराव देशमुख, सदस्य, सोसायटी भोकर,गजानन सोनकांबळे, अॅड शेख सलीम,अॅड अल्तामश शमशोद्दीन,राजू पांचाळ, महेंद्र दुधारे, गजू पाटील सोळंके, संजय नाईकडे, संजय बनसोडे, साहेबराव वाहूळकर, शेख जब्बार, तुकाराम महादावाड, मिठूभाऊ राठोड, सतीश चाटलवार, श्याम बोड्डेवार, येळेगावचे युवा नेते बालाजी पाटील जाधव, पिंटू देशमुख असंख्य कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश घेतला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीच्या लागून जास्तीत जास्त आपले प्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी काम करावे असे आवाहन केले यावेळी बालाजी पाटील गौड,रवि गेंटेवार,आनंद पाटील शिंदीकर, पंकज देशमुख भोसीकर, सिद्धू पाटील चिंचाळकर, विजय पाटील पोमनाळकर, कैलास पाटील कोळगावकर, परसू पाटील दौरकर, बळी पाटील, राजू कोरडे, शिवराज स्वामी, शेख खुर्दस, साईनाथ रिटेकर, बाळू पाटील नांदेकर, नामदेव जाधव नांदेकर यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

jalgaonsandesh

jalgaonsandesh