अपंग आयुक्त पुणे यांचे जिल्हाअधिकारी नांदेड यांना दिव्यांग बांधवाच्या तेरा प्रश्नासाठी योग्य ते कार्यवाहि करण्याचे आदेश धडकले हे दिव्यांगाच्या निषैध आंदोलनास यश, चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड – (प्रतिनिधी ), महाराष्ट्रात दिव्यांगाना त्यांचा हक्क मिळावा म्हणून शासननाने दिव्यांग कायदा २०१६ कायदा कलम 92,/93 कलमाची अंमलबजावणी नसल्यामुळे नांदेड येधील अंध अंकुश हट्टेकर ,पती पत्नी दोघेहि अंध असुन यांची सहा वर्षाची आरोव्हि बालीकेचा खुण,करुन नदीत टाकला तरी पोलिस त्यांची लवकर दखल घेतली नाहि,अशा दोषी अधिकारी यांच्यावर कारवहि करुन खुण करणाऱ्याना फाशी द्यावी या अंध जोडप्याचे पुनर्सवन करावे.

दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायदा करून शासन अनेक निर्णय काढुन प्रशासकिय स्थरावर अंमल बजावणी व्हावी म्हणून ग्रामपंचायत स्थरावर दिव्यांगाच्या ग्रामसभा घेऊन कठोर अंमल बजावणी करण्याचे आदेश

असताना अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासन प्रशासन जागे करण्यासाठी सोल्हापुर जिल्ह्यात दिव्यांग बाधव हक्कासाठी ऊपोषण करतेवेळी कु.वैष्णवी कुरळे चा मृत्यु झाला यास शासन,प्रशासनाच्या निष्काळ जीपणामुळे जीव गमावला अशा दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाहि करून कुंटुबाला शासनाने आर्थिक मदत करावी

अशा तेरा प्रश्नासाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग,वृध्द निराधार, मित्र,मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली अपंग आयुक्त पुणे येथे भर पावसात नांदेड जिल्हयातील शेकडो दिव्यांग बांधव आपल्या हक्कासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी

निषेध आंदोलनात दिव्यांग आयुक्त यांनी दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून नांदेड जिल्हाअधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि,प,,पोलिस अधिक्षक नांदेड,जिल्हापुरवठा अधिकारी यांना तात्काळ दिव्यांगाच्या प्रश्नावर योग्य ते कार्यवाहि करण्याचे लेखी आदेश दिले,

दिव्यांग बांधवानी संघटिपणे संघर्षात शासनाचा प्रशासनाचा निषैध आंदोलनाची तात्काळ पाच दिवसात अपंग आयुक्त पुणे यांनी घेतली जिल्हयातील अधिकारी यांनी वरीष्ठाच्या आदेशाची अंमलबजावणी करून दिव्यांगाना न्याय हक्क न देणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करून दिव्यांगाना न्याय द्यावा असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,जि.अध्यक्ष ज्ञांनेश्वर नवले,नागोराव बंडे, राजुभाऊ शेरकुरवार,बालाजी होनपारखे, मगदुम शेख दतात्रय सौनकांबळे, प्रेमसिंग चव्हाण,रंजीत पाटिल, अनिल रामदिनवार,विठ्ठल बेलकर,ईत्यादी कार्यकर्त्यानी केले

ताजा खबरें