मा श्री अमितजी ठाकरे यांच्या नेतृवात्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण_विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठवाडा विभागाच्या वतीने धडक मोर्चा

मुंबई – मा.श्री.अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मराठवाडा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना भेडसावत असणाऱ्या विविध शैक्षणिक समस्यांना वाचा फोडण्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर दिनांक १५ रोजी”धडक मोर्चा”. काढण्यात येणार आहे.

यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत :-

1) धाराशिव येथील उपकेंद्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी मार्गी लावण्यासाठी अधिक मनुष्य बळ उपलब्ध करत सोई सुविधा मध्ये वाढ करून देण्यात यावी.

2) अंबाजोगाई येथे कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यासाठी विद्यापीठा ने तीन वर्षा पूर्वी अधिग्रहित केलेल्या पंचवीस एक्कर जमिनीवर लवकरात लवकर कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात यावं.

3) जालना जिल्ह्यातील विद्यापीठा द्वारे संचलित मॉडेल कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना कुठलीही शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसून त्या सुविधा तात्काळ पुरवण्यात याव्या.

4) विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्र सुरु करण्यात यावीत.

5) परीक्षा चे निकाल परीक्षा संपल्या पासून ४५ दिवसात लावण्याच्या नियमाची सक्तीने अंमलबजवणी करण्यात यावी.

6) २०२१ पासून PET परीक्षा घेण्यात आली नाही. PET ची परीक्षा तात्काळ सुरु