देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही : केंद्र

नवी दिल्ली : अनेक देशांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. मात्र, भारतात या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. ओमायक्रॉन विषाणू प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आल्याचेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्यमंत्र्यांनी ओमायक्रॉन विषाणूबाबत माहिती दिली. ‘‘सध्या १४ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मात्र भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. देशातील सर्व विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून काही संशयित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत,’’ असे मंडाविया यांनी सांगितले.

सध्या देशात करोनास्थिती नियंत्रणात आहे. मात्र अजूनही देश करोनामुक्त झालेला नाही. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची काळजी घेत आहेत. घरोघरी लसीकरण ही केंद्राची मोहीम सुरू असून दररोज ७० ते ८० लाख लसमात्रा दिल्या जात आहेत. देशात आतापर्यंत १२४ कोटी लसमात्रा देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे ६७८ नवे रुग्ण

मुंबई : राज्याच्या करोना रुग्णआलेखाची घसरण कायम आहे. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६७८ रुग्ण आढळले, तर ३५ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबई १८०, पुणे जिल्हा २०३, ठाणे जिल्हा ७४, नगर जिल्हा ४९ रुग्ण आढळले. राज्यात सध्या ७,५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित