“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी

मुंबई – अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या भाजपकडून करण्यात येत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यादिवशी उपवास ठेवणार असून शरयू नदीत ते स्नानही करणार आहेत.

त्यामुळे या सोहळ्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच २२ जानेवारीला राज्यात तसेच संपुर्ण देशात दारू आणि मास बंदी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

आयोध्येत होणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपुर्ण हिंदुस्थान या पवित्र दिवसाला एखाद्या सणाचे महत्व आले आहे. त्यामुळे २२ जानेवारी या पवित्र दिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारू आणि मांस बंदी करण्यात यावी. तसेच केंद्र सरकारलाही २२ जानेवारी या दिवसाकरिता संपुर्ण देशात दारू आणि मांस बंदी व्हावी याकरिता महाराष्ट सरकारच्या वतीने विनंती करण्यात यावी. या पवित्र दिवसाचे महत्व लक्षात घेता त्यादिवशी महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी. अशी मागणी राम कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोठी रणनिती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यातच लोकसभा निवडणुकांच्या अगोदर दररोज ५०,००० भाविकांना राम लल्लाचं दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच आता २२ जानेवारीला पंतप्रधान उपवास करणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

माननीय ना. श्री. एकनाथ शिंदेजी

अयोध्येत होणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पवित्र दिवसाचे महत्व लक्षात घेता त्यादिवशी महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी याबाबत…. तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला…