देगलूर येथे महागाईमुक्त भारत आंदोलन.

शिवानंद उप्पे

नांदेड ( दि.०५) भारत देशात सद्या घडीला महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे.आजची परिस्थीती पाहता पेट्रोल, डिझेल,गॅस सिलेंडर यांच्या किमती गगनाला भिडले आहेत, याच पेट्रोल,डिझेलच्या किमती कर्नाटक राज्यात किमान दहा रुपयाने कमी असल्यामुळे याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.याच अनुशंगाने आज दि.०४ एप्रील २०२२ रोज सकाळी दहा वाजता मा.ना.नाना पटोले व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानूसार केंद्र सरकारने लादलेल्या महागाईच्या विरोधात देगलूर तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, विद्यार्थी काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मोर्चा व जनजागृती आयोजीत करण्यात आली होती. या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून करण्यात आली व मा. उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर व मा. तहसिलदार साहेब देगलूर यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर, शिवाजीराव देशमुख बळेगावकर(माजी सभापती प.स.),शंकरराव कंतेवार शहराध्यक्ष,माधवराव मिसाळे माजी जि.प.सभापती,मोगलाजी शिरशेटवार माजी नगराध्यक्ष,प्रितम देशमुख तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष,रामराव नाईक जि.प. सभापती,दिलीप बंदखडके ग्रा.पं. सदस्य हणेगाव,बालाजी टेकाळे, दिपक शहाणे,बाळासाहेब देशमुख कावळगावकर,जनार्धन बिरादार, बालाजी पाटील थडके,सौ.नंदाताई देशमुख,सौ.जयश्री काब्दे,सौ. चव्हाण ताई,नितेश पाटील भोकसखेडकर,उमेश पाटील, ताराकांत पाटील,अभयसिंह देशमुख,सादीक मरखेलकर,माधव वाडेकर,पांडूरंग पाटील सोमुरकर, विष्णूकांत पाटील,भास्कर पाटील ढोसणीकर,दिनेश देशमुख,प्रशांत दोसपल्ले,माडपत्ते,शहाजी देशमुख, वसीम शहापूरकर,दिनू पाटील मुजळगेकर,योगेश गायकवाड, यादवराव पाटील,राजाराम कांबळे, इलियास बागवान,बरसमवार, हणमंत आचेगावे,बटूक पाशा,संतोष पाटील,गडमवार,पेंटेवार सावकार,दिनेश वैष्णव,सुजायत देशमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी सांगितले की,केंद्र सरकार फक्त मोठमोठया कंपनी व व्यापाऱ्यांच्या फायद्याचा विचार करीत आहे परंतू याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे याची जान केंद्र सरकारला अजीबात कळत नसल्याचे दिसून येत आहे असे ते यावेळी म्हणाले.

ताजा खबरें