दलितांचा नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर–14 एप्रील या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , राजकारणी , तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते . त्यांनी दलीत , बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश लोकांविरुध होणारा सामाजीक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणी , तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केल. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता आपले शिक्षण समाजाच्या उपयोगी आले पाहीजे . अस्पृशांचे प्रश्न फार बिकट आहेत याची मला जाण आहे हे सर्व प्रश्न मी सोडवू शकणार नाही , परंतू ते सर्व प्रश्न जगासमोर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधे न एवढा मला आत्मविश्वास आहे . देशातील जातीयता नष्ट व्हावी असे त्यांना नेहमी वाटायचे म्हणून त्यांनी अन हिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहीला त्यांनी आपले जीवन लोकांसाठी समर्पित करुन शिक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयोग या देशातील शोषीत, पीडित , वंचीत , उपेक्षित , मागास ,आदिवासी , कष्टकरी यांच्यासाठी केला .

डॉ . बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्ती निशी जागा केला. त्याला आत्मसन्मान , स्वाभिमान , अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली . मानसिक गुलामगिरीतून मूक्त केले हक्काने जगण्याचे शिकवले त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करुन समता व न्याय समाजात निर्माण केले जर देशाला विकासाच्या दिशेने जावयाचे असेल तर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही असे मला वाटते . त्यांचे लिखाण वृतपत्रे– मूकनायक1920, बहिष्कृत भारत .1927, जनता1930, प्रबुद्ध भारत1956. ग्रंथ– शुद्र पूर्वी कोण होते, दिअनटेबल्स अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर सिंध्दात लिहीले प्रॉब्लेम ऑफ दि रुपी पार्टी शन ऑफ इंडिया , हिंदू कोड बील, भारताचे संविधान , द बुद्ध अॅड हिज धम्मा अशी पुस्तके व ग्रंथ आजच्या तरुण पिढीने अभ्यासणे गरजेचे आहे.

श्री.एस.एस. अहिरे ,मुख्याध्यापक–नेहरू विदया मंदिर तळवेल ,ता. भूसावळ , जि. जळगांव

jalgaonsandesh

jalgaonsandesh