ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालूका अध्यक्षपदी महादेव उप्पे यांची निवड.

प्रतिनिधी:शिवानंद उप्पे.

नांदेड(दि.04) केंद्र सरकार नोंदणीकृत असलेल्या माणूसकी सोशल फाँउडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या तालूका अध्यक्षपदी हणेगाव येथील दैनिक मराठवाडा नेताचे पत्रकार महादेव शरणप्पा उप्पे यांची निवड करण्यात आली आहे.

या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी विश्वास दाखवून महादेव उप्पे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.या निवडीबद्दल राज्य महिला अध्यक्षा रंजना देशमुख,प्रभाकर पांडे,विठ्ठल वळसने,मौजम फारूखी,राजकुमार हदिखेरे,जेष्ठ पत्रकार किशोरजी आडेकर,सद्दाम दावणगीरकर, आदित्य बागबंदे,महादेव हणमंतराव उप्पे, महालिंग स्वंतकर,रविंद्र वंटगिरे आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

ताजा खबरें