बेलव्हाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ येथे बिबट्या सारख्या हिंस्र प्राण्याने हल्ला करून गाय ठार केल्याची घटना घडली.

या बाबत माहिती अशी की , गोविंदा श्रावण पाचपांडे रा. बेलव्हाळ यांनी आपल्या निमगाव रस्त्यावर असलेल्या गुरांच्या वाड्यात बैलजोडी व गाय बांधलेली होती दि.५ सप्टेंबर चे रात्री ते ६ सप्टेंबर च्या पहाटे ४ वाजेच्या च्या सुमारास कोणत्या तरी हिंस्र प्राण्याने गायीवर हल्ला करून गायीला ठार मारले .सकाळी हा प्रकार लक्षात आला त्यानंतर पोलीस पाटील निलेश आंबेकर व सरपंच, ग्रामसेवक यांना माहिती देण्यात आली. पत्रकार जितेंद्र काटे यांनी तलाठी व कुऱ्हा पानाचे वनविभाग कार्यालयात माहिती कळवली. काही वेळा नंतर वनविभागाचे विलास काळे व नरेंद्र काळे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला तर मयत गायीचे शवविच्छेदन कुऱ्हा पानाचे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. येवले यांनी केले.

याच ठिकाणी दोन तीन वर्षापूर्वी बिबट्याने गायीवर हल्ला केला होता. पुन्हा त्याच गोठ्यात बिबट्या सारख्या प्राण्याने हल्ला चढविला असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी अशी मागणी केली जात असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी बेलव्हाळ ग्रामस्थांनी केली आहे.

ताजा खबरें