पाटणा येथील प्राणीसंग्रहालयात सुरू असलेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय जीवशास्त्रज्ञ परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या पक्षांमधील नेत्यांना अहंकारी म्हणाले होते. याबाबत तेज प्रताप यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही आहेत. आता भाजप पराभूत झाली आहे. आगामी निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. भाजप, आरएसएस आमच्या महाआघाडीसमोर म्हणजेच इंडियासमोर टिकू शकणार नाहीत. मी याआधीही सांगितलं आहे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2025 च्या बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असेही तेजप्रताप म्हणाले.
पंतप्रधान नरेंद मोदी हे देशद्रोही; तेज प्रताप यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य
बिहारचे पर्यावरण आणि वनमंत्री तेज प्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मदी यांना देशद्रोही म्हटले आहे. ज्या देशात ते राहतात, देशाचे नेतृत्व करतात आणि त्याच देशाला ते शिव्या देतात, हे योग्य नसल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले आहे.