प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच ग्रामसेविका प्रतिभा रमेश तायडे यांनी संविधान वाचन केले. यावेळी सागर शिरसाळे, पत्रकार जितेंद्र काटे , युवराज पाटील, एकनाथ सपकाळे, प्रविण पाटील, विष्णू सपकाळे , लिलाधर पाटील, एस आर पाटील, शांताराम बिऱ्हाडे, सुरेश सपकाळे, मधुकर शिरसाळे, शिपाई पंकज पाटील, सचिन शिरोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.