वेबसाईट चालत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरणारे संभ्रमात?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – महाराष्ट्र राज्यात हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे दि.१६ ते दि.२० आॅक्टोबर दरम्यान आॅनलाईन नोंदणी करण्यात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे मात्र पहिल्या दिवसापासून वेबसाईट चालत नसल्याने अर्ज सबमिट होत नसल्याने प्रिंट आऊट काॅपी मिळत नाही त्यामुळे तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येत नसल्याने दोन दिवसात एकही अर्ज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेला नाही. या बाबत अनेक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली परंतु अजूनही काही पर्याय निघत नसल्याचे सांगितले जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोन दिवस वाया गेल्याने मुदतवाढ मिळावी तसेच  ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती द्यावी अशी मागणी भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh