यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार 

आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याचा दणका

प्रतिनिधी – अमीर पटेल

यावल – येथील डॉ.जाकिर हुसेन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्रात आज दि. ७ रोजी फैजपूर उपविभाग आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक महिला पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांना परीक्षा केंद्रात कॉपी सुरू असल्याचा प्रकार आढळून आल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना पुढील कार्यवाही बाबत सूचना दिल्याने धनके यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला. आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याच्या या कायदेशीर दणक्यामुळे शिक्षण क्षेत्रात, राजकारणासह लोकप्रतिनिधीमध्ये मोठी खळबळ उडाली.

प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी यावल पोस्टला फिर्याद दिली की यावल तालुक्यातील सर्व शाळा,ज्युनियर कॉलेज यांचे कामकाजावर नियंत्रण माझे दैनंदिन कर्तव्य आहे.

सध्या माध्यमीक विद्यालय १० वी वर्गाची मुख्य वार्षीक परीक्षा सूरू आहे. सदर परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षेच्या दरम्यान पेपर सोडवितांना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे गैरप्रकारांचा अवलंब करू नये (कॉपी वगैरे) याकरीता प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गावर शाळेचे केंद्र संचालकांमार्फत उप केंद्रसंचालक, शिक्षकांची पर्यवेक्षक व मुख्य ईमारत पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येते. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभाग व पंचायत समितीकडून बैठे पथकांचीही नेमणूक करण्यात येते.

दि.०७.०३.२०२४ रोजी यावल शहरातील यावल येथील डॉ. जाकीर हुसैन माध्यमीक व उच्च माध्यमीक यापरीक्षा केंद्रावर सकाळी ११.०० ते ०२.०० असा आज रोजी १० वी चा इंग्रजी विषयाचा पेपर होता.परीक्षा सूरू होण्यापूर्वी बैठे पथकाने प्रत्येक वर्गात जावून तपासणी केली व प्रत्येक पर्यवेक्षकांना परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही कोणत्याही विद्यार्थ्यास कॉपी वगैरे करू न देणे बाबत आवश्यक सुचना दिल्यात. त्यानंतर परीक्षा ठिकाण ११.०० वाजता सूरू झाली. परीक्षा सूरू असतांना बैठे पथकातील अधिकारी सदस्य १) श्रीमती बबिता सुधाकर चौधरी, २) हेमंत विश्वनाथम ४ मारोडे, ३) पंढरीनाथ किसन अडकमोल, ४) श्रीमती सीमा दादाराव सातघरे, ५) उमेश शिरीष मुंडके, ६) महेमुद फत्तू तडवी हे तपासणी करीत असतांना दुपारी ०२.०० वाजेचे सुमारास सदर परीक्षा केंद्रावर आयपीएस महिला सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह फैजपूर उप-विभाग फैजपूर तसेच यावल पोलीस स्टेशनचे पोलीसांनी भेट दिली असता सदर परीक्षाकेद्रावर ब्लॉक क्र. ०६ मधील एक विद्यार्थीनी कॉपी (कागद) बाहेर फेकतांना दिसून आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक मॅडम यांनी परीक्षाकेद्रावर परीक्षेचे कामकाज करणारे केंद्र संचालकांसह सर्वांना यावल पोलीस स्टेशनला बोलाविले. मी माझे कस्टडीचे कामकाज करीत असतांना मला त्यांनी पोलीस स्टेशनला बोलावून विचारपूस केली. त्यांनंतर मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक यांनी बैठे पथकास झाले प्रकाराबाबत रितसर मला रिपोर्ट देण्यास सांगितले. त्यावरून वर नमुद बेटे पथकातील अधिकारी सदस्य यांनी मला लेखी अहवाल सादर करून त्यात नमुद केलेले आहे. बैठे पथकाने सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असून त्यावरून यावल शहरातील डॉ.जाकीर हुसैन माध्यमीक व उच्च माध्यमीक यापरीक्षा केंद्रावर वरील घटनेसंदर्भात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याने सदर गैर-प्रकारास जबाबदार असलेले केंद्र प्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसिदास दगडू चोपडे सर, ब्लॉक क्र.०६ चे पर्यवेक्षक एस.एस.सोनवणे व मुख्याध्यापक जी.एन.खान यांचे विरूध्द सरकार तर्फे महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनीदिष्ट परीक्षांमध्ये होणा-या गैर-प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चे कलम ७, ८ सह भा. द. सं. कलम १८८ अन्वये फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला