फ्लाइंग किस’वरून भाजपच्या महिला खासदार आक्रमक; राहुल गांधींविरोधात तक्रार

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात ‘अयोग्य’ वर्तन केल्याबद्दल सभापतींकडे तक्रार केली आहे.

महिला खासदारांनी पत्रावर स्वाक्षरी करून राहुल गांधी यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

‘संसदेतील महिला खासदारांना फक्त एक स्त्रीद्वेष्टाच फ्लाइंग किस देऊ शकतो. असे उदाहरण यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. यावरून ते महिलांबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. हे अश्लील आहे, असं स्मृती इराणी संसदेत म्हणाल्या.

संसदेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी भाजपच्या सदस्यांना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप भाजपच्या महिला खासदारांनी केला आहे.