भुसावळ – मोठी लोकसंख्या असलेलं गाव स्मार्ट व्हिलेज दर्जा निर्माण करणे सोपं नसतं मात्र ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थांच्या एकजुटीने गावाने आदर्श दर्जा प्राप्त करणे कौतुकास्पद असल्याचं मत महाराष्ट्र राज्याच्या आदर्श ग्रामविकास समितीचे अध्यक्ष ग्राम संसद पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांनी साकेगाव ग्रामपंचायत भेटीदरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले
प्रसंगी भुसावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री अतुल पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी श्री चौधरी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याच्या आदर्श ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे सदस्य. व उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री गौरव पुरस्कार प्राप्त करणारे आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार साहेब यांनी दिनांक 9 रोजी स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे संध्याकाळी सात वाजता भेट दिली प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच कमिटीच्या व गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी त्यांचा सत्कार केला प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावातील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये तसेच आजचा मोबाईलचा युवक हा ग्रामपंचायत प्रशासनाने मैदानावर आणलेला असून अशा युवकांना प्रोत्साहित करणे विविध कला व क्रीडा उपक्रम राबविणे तसेच मोठ्या लोक लोकवस्तीच्या गावाला आदर्श पायाभूत सुविधा पुरवणे ग्रामपंचायत प्रशासनाचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे पुढील वेळेस नियोजनबद्ध वेळ काढून गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार व स्मार्ट विलेज साठी गावला राज्यस्तरीय मॉडेल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन श्री पोपटराव पवार साहेब यांनी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना संबोधित करताना केले यावेळी त्यांच्या हस्ते गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जितेंद्र पाटील उर्फ छोटू ,डॉक्टर कैलास ठाकरे, प्रमोद चव्हाण, डॉक्टर बाळासाहेब पाटील, गावातील नवनियुक्त पीएसआय मनीष राजेंद्र पाटील, सुरज पवार आदींचा सत्कार श्री पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित महिला बचत गटामध्ये लकी ड्रॉ च्या माध्यमातून दोन पैठणी महिलांना भेट देण्यात आल्या तसेच नाना धामोडे यांच्या मुलीचा देखील त्यांनी सत्कार केला
प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच योगिता सोनवणे उपसरपंच आनंद ठाकरे भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील दिलीप सिंग पाटील ग्रामविकास अधिकारी प्रीतम शिरतुरे सुरेश दादा पाटील वामनदादा कचरे, राजेंद्र बाबुराव पाटील जोगलखेडा सरपंच पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे, अशोक सपकाळे सागर सोनवाल भूषण सिंग राजपूत ,गणेश कोळी, गजानन पवार, सुभाष सोनवणे, विलास ठोके सदस्या मनीषा अजय चौधरी सह समस्त बचत गटाच्या महिला व आरोग्य सेविका अशा वर्कर्स तसेच गावातील मान्यवरांची उपस्थिती होती