ममुराबाद येथील दत्त चौकात साचले पाण्याचे डबके: साचलेल्या पाण्याचा नागरीकांना त्रास 

ममुराबाद – : येथील दत्त मंदिर परिसरात बऱ्याच दिवसापासून पाण्याचे डबके साचल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील ऐन रहदारीच्या मार्गावर पाऊस आला की गुडगाभर पाणी साचल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या साचलेल्या डबक्या समोरच दत्ताचे मोठे मंदिर आहे त्याचप्रमाणे दत्त मंदिराच्या शेजारीच शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे. बसस्टॉप कडून येणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ सुरु असते.

पाणी साचून राहत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना जाताना येताना मोठा त्रास सहन करावा लागतो.

अनेकदा दुचाकी तसेच चार चाकी वाहन या पाण्यातून भरधाव जात असताना अलगद घाणेरडे पाणी अंगावर उडवतात. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. पाण्याने साचलेल्या डबक्या शेजारीच गावातील मेन लाईनचा ट्रॉन्सफार्मर असल्याने तेथे कोणत्याही क्षणी शाटसर्कीट होऊन मोठा अपघात होऊ शकतो.

पावसाळा सुरू असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे.त्यामुळे आरोग्याचा प्रश्न येरनीवर येण्याची शक्यता आहे.

या विषयाबाबत दत्त मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तोडी तसेच लेखी पत्राद्वारे सदर साचलेल्या पाण्याबाबत माहिती दिली असता ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र याकडे जाणिवपुर्वक दुलर्क्ष केल्याचे नागरीकांनी सांगीतले.

सरपंच हेमंत चौधरी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगीतले मि कॉन्ट्रॅक्ट यांचेशी फोनवर सदर विषयाबाबत चर्चा केली गावातील नागरीकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगीतले परंतु पाऊस सतत सुरु असल्यामुळे सध्या सदर रस्त्याचे काम सुरू करता येणार नसल्याचे सांगितले. परंतु दत्त मंदिराच्या समोरील साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये लवकरच वेस्ट मटेरीयल किंवा दुसरे काही टाकुन तेथील पाणी काढले जाईल बाहेर गटारीत काढण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगीतले.

ताजा खबरें