चोपड्यात कोळी समाजाचा वधू-वर सुचक महामेळावा उत्साहात संपन्न..

चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील आदिवासी टोकरेकोळी जमातीचा (प्रथमवर्ष) वधू-वर सूचक व पालक परिचय महामेळावा उत्साहात संपन्न झाला. हा मेळावा समस्त कोळी समाज पंच मंडळ विटनेर व श्री एकविरा कृषी सेवा केंद्र चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता. मेळाव्यात सुमारे १२० पेक्षाही जास्त मुला-मुलींनी परिचय दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे नेते ह.भ.प.विठ्ठल महाराज बोरसे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जयगुरुदेव संगतचे जेष्ठवक्ते परमपूज्य भबुतरावअण्णा सोनवणे (खर्देकर) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, महर्षी वाल्मिकी प्रतिमा पूजन व समाजमहर्षि स्व. सितारामबापू देवराज (गलंगीकर) यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

प्रार्थनागायक खंडू महाराज (कोळंबेकर) यांनी स्वागतगीत सादर केले. समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी पोलीस अधिकारी छगन देवराज, रंगराव देवराज, जि.प.चे माजी सदस्य शांताराम सपकाळे, पं.स.चे माजी सभापती डी.पी.साळुंखे, प्रवचनकार भरत सपकाळे जळगाव, तापी सूतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर, माजी सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक कैलास सोनवणे, मिशनस्कूलचे अध्यक्ष स्तेपन सपकाळे, माजी डेपो मॅनेजर श्री.शिरसाठसाहेब, एलआयसी.अधिकारी संजीव बाविस्कर, माजी उपसभापती सुभाष रायसिंग, जळगांव पाडाखोत संस्थेचे संचालक लखिचंद बाविस्कर, जयगुरुदेव संगतचे पितांबर पाटील, नारायणदादा, प्रकाश तायडेसर, ग.स.चे शाखाधिकारी दिलीप सपकाळे, माजी पीआय राजेंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक प्रल्हाद ठाकरे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी चोपड्यासह अमळनेर, धरणगाव, जळगाव, यावल, भुसावळ तालुक्यातून आलेल्या मुला-मुलींनी सुद्धा परिचय पत्र भरून दिलेले आहे. लवकरच त्यांची वधू वर सूचक पुस्तिका बनवण्यात येणार आहे. याबाबतची संपुर्ण फाईल श्री एकविरा कृषी सेवा केंद्र, दु.नं.२, बापूजी कॉम्प्लेक्स्, यावल रोड, चोपडा येथे उपलब्ध राहील, अशी माहिती मेळाव्याचे स्वागताध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी लखिचंद बाविस्कर, प्रल्हाद ठाकरे, भरत पाटील, गोपीचंद बाविस्कर, मधुसूदन बाविस्कर, गव्हरलाल बाविस्कर, भगवान बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, मुरलीधर बाविस्कर, नवल देवराज, सागर साळुंखे, किशोर कोळी, भावलाल कोळी, विशालराज बाविस्कर, वैभवराज बाविस्कर यांचेसह म. वाल्मिकी ग्रुप व गाववॉईज सेवाधिकारी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी जिल्ह्याभरातून शेकडोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. समितीच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आलेली होती.

प्रभावी सूत्रसंचलन तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन गोपीचंद बाविस्कर (गुरुजी) यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील