छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे प्रत्येकासाठी ठरणार स्फुर्तीस्थान !

प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन 

धरणगाव – नगरपालिकेने उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील. हे प्रवेशद्वार विचारांना शिवसंस्काराची चालना देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. हे प्रवेश द्वारे धरणगावच नव्हे तर येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येकासाठी स्फुर्तीस्थान ठरणार आहे. छत्रपतींच्या विचारांची वाटचाल म्हणून त्यांचे विचार, त्यांचे स्मरण राहावे म्हणून प्रवेशव्दाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. विशेष करून यातून तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाचे प्रत्येक क्षणाला स्मरण होणार आहे. याच प्रमाणे वर्तमानातही काही तरी भव्य-दिव्य करण्याची प्रेरणा नक्की मिळेल असे प्रेरणादायी प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील छत्रपतींच्या भव्य पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणार असून त्यासाठी १ कोटींचा निधी मंजूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धरणगाव येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डी. जी. पाटील हे होते.

सुरुवातीला धरणगाव येथील नगरपालिकेने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फटाक्यांच्या आतषबाजीत, शिवरायांच्या जय घोषात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर प्रवेशद्वार हे नगरपालिकेच्या वैशिष्टपूर्ण योजनेतर्गत मंजूर करण्यात आले होते. यावेळी प्रवेशद्वार बांधकाम ठेकेदार शे.अहमद मिस्तरी यांचा तसेच विशेष सहकार्याबद्दल वाल्मिक पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल – श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्षीय भाषणात डी.जी. पाटील यांनी सांगितले की, प्रवेशद्वारामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळेल त्यातून प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असे सांगितले. पालकमंत्री म्हणाले की, ऐतिहासिक अश्या धरणगाव शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. धावडा धरणावरून शहरासाठी ४४ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगितले. तसेच छ.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरणासाठी १ कोटी निधी मंजूर करणार असल्याची ग्वाहीदिली. हेगडेवारनगर गावासाठी १९ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असल्याचे सांगितले.

३० लाख खर्च करून उभारले प्रवेशद्वार !

यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातुन व माजी नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नाने धरणगाव नगरपालिका हद्दीत या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिट्य पूर्ण योजनेंतर्गत ३० लक्ष निधी खर्च करून सदर प्रवेशद्वार उभारण्यात आले.

यांची होती प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे पी. एम. पाटील सर यांनी केले. सूत्र संचालन माजी नगरसेवक गुलाब मराठे यांनी केले तर आभार उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी मानले. या प्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, सोनी महाजन ,जेष्ठ नेते सुभाष पाटील, संजय महाजन, गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, दीपक वाघमारे, सरपंच साविताताई सोनवणे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, रामकृष्णा महाजन, समस्त कुणबी पाटील व सूर्यवंशी क्षेत्रीय मराठा समाजाचे प्रतिष्ठीत पांडुरंग मराठे, भीमराव पाटील, भरत पाटील, सी.के. पाटील, वासुदेव चौधरी, विजय महाजन, मोतीआप्पा पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, जीवनआप्पा बयास, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे, भाजप महिला आघाडीच्या रेखा पाटील, यांच्यासह, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh