१ एप्रिलपासून ‘UPI पेमेंट’ वर आकारले जाणार शुल्क ! २ हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारावर लागणार ‘इतका’ चार्ज

सध्या डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेआहे. प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात पेमेंट करता येत असल्यामुळे कशी जवळ बाळगण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

आपण ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ कंपनीने Gpay, Phonepe, Paytm इत्यादी Apps द्वारे पेमेंट करताना शुल्क भरावे लागणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी केले आहे.

NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यापारी व्यवहारांवर चार्जेस आकारण्याची सूचना केली आहे. याचा अर्थ पुढील महिन्यापासून तुम्हाला व्यापाऱ्यांसोबत केलेल्या व्यवहारांसाठी पैसे द्यावे लागतील.

NPCI ने व्यापारी व्यवहारांवर ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट’ (PPI) शुल्क आकारण्याची सूचना केली आहे. एका रिपोर्टनुसार UPI पेमेंट सिस्टीमची प्रशासकीय संस्था २,००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर PPI शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. म्हणजेच व्यवहाराच्या रकमेच्या १.१% दराने इंटरचेंज चार्जेस आकारले जाणार आहेत.

इंटरचेंज व्यवहार हे या प्रक्रियेचा खर्च वसूल करण्यात मदत करणार आहे. म्हणजेच इथून पेमेंट करणे महाग होणार आहे. NPCI ने उद्योग आणि अन्य क्षेत्रानुसार वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. कृषी आणि दूरसंचार क्षेत्रासाठी यामधला दर कमी असणे अपेक्षित आहे. UPI शी संबंधित सर्व नियम हे १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. रिपोर्टनुसार UPI पेमेंटपैकी ७० टक्के रक्कम २,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.

३० सप्टेंबर २०२३ ला होणार पुनरवालोकन

UPI पेमेंट सिस्टीम सध्या शून्य व्यापारी सवलत म्हणजेच (MDR )मॉडेलवर चालते. मात्र UPI साठी नवीन नियम आल्यामुळे अधिक चार्ज लावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये चार्जेस संबंधित नवीन मॉडेलचे ३० एप्रिलपर्यंत किंवा त्याआधीच त्याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh