भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल.
आज या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं. (Chandrayaan-3 Mission)
Chandrayaan-3 Mission:
The orbit-raising maneuver (Earth-bound perigee firing) is performed successfully from ISTRAC/ISRO, Bengaluru.
The spacecraft is expected to attain an orbit of 127609 km x 236 km. The achieved orbit will be confirmed after the observations.
The next… pic.twitter.com/LYb4XBMaU3
— ISRO (@isro) July 25, 2023
पृथ्वीभोवती शेवटची फेरी
पाचव्या कक्षेत ढकलण्यात आल्यानंतर काही वेळातच हे चांद्रयान पृथ्वीपासून 1,27,609 किलोमीटर बाय 236 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचेल. सध्या या यानाची स्थिती उत्तम असून, त्याची रेडियस काही चाचण्यांनंतर निश्चित सांगण्यात येईल. इस्रोने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
पुढची फायरिंग 1 ऑगस्टला
यानंतर एक ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान-3 ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेदरम्यान ही क्रिया पार पडेल.
चंद्राभोवतीही मारणार फेऱ्या
चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल. यासाठी पृथ्वीच्या कक्षेतून ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाहेर पाठवण्यात आलं, त्याच्या अगदी उलट पद्धतीने चंद्राच्या कक्षेत ते प्रवास करेल.
सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास, २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर लँडिंग करु शकेल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.