देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

देशात – यावर्षी तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचीच दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी मोठी बैठक घेतली.

यातआयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.

बैठकीनंतर मनसुख मांडविया म्हणाले, “आयएमडीने या वर्षी एल निनोचा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता जास्त आहे. आयएमडीने म्हटले आहे की, या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. ते म्हणाले की, हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे आणि उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात टाळण्यासाठी मी, आयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह तपशीलवार आढावा घेतला आहे आणि केंद्राला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.”