25 जून संविधान हत्या दिन; केंद्राची घोषणा

केंद्र सरकारने 25 जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. सरकारने राजपत्राद्वारे याबाबतची अधिसूचनाही जारी केली.

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. लाखो लोकांना तुरुंगात डांबले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. या पार्श्वभूमीवर त्या दिवसाची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh