सुनसगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच काजल कोळी व उपसरपंच एकनाथ सपकाळे तसेच सदस्य वैशाली पाटील, शामराव मालचे, रामचंद्र मिस्तरी यांनी पूजन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंदा सपकाळे, माजी उपसरपंच विष्णू सपकाळे, युवराज पाटील, भोजराज कोळी, कैलास लोहार, रोहिदास पाटील व पत्रकार जितेंद्र काटे यांनी अभिवादन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र पाटील, सचिन शिरोळे, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती यावेळी मुख्याध्यापिका व शिक्षिका उपस्थित होते. येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले मुख्याध्यापक जे पी सपकाळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh