वन कर्मचार्‍याला जीवे धमकी : गुन्हा दाखल

यावल – सातपुडा वनक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या देवझीरी कार्यक्षेत्रात हंडया कुंडया नियतक्षेत्र क्रमांक१६६व१७७ येथे अवैद्यरित्या सागवानच्या वृक्षांची कत्तल करून ठेवलेले ४८नग जप्त करून कारवाई केल्याप्रकरणी या वृक्षतोडील संशयीत कांतीलाल गुलाब पावरा याने वन कर्मचारी यांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , सातपुडा वनक्षेत्रात देवझिरी वन परिक्षेत्रात येणार्‍या हंडया कुंडया या क्षेत्रातील अवैद्यरित्या नियतक्षेत्र कक्ष १६६व१७७या ठीकाणा हुन सुमारे ४८ सागवान वृक्षांची तोड केले करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

यानंतर, या क्षेत्रात वनपाल म्हणुन कार्यरत असलेले वनरक्षक विजय मोत्या पावरा, वनसेवक रविन्द्र बारेला व संजय बारेला यांना दिनांक १३ मार्च रोजी वृक्षतोड प्रकरणात संशयीत असलेला आरोपी कांतीलाल गुलाब पावरा राहणार खैर कुंडीपाडा या व्यक्तिने देवझिरी वनपरिक्षेत्र येथील कार्यालयात येवुन त्या ठीकाणी कर्तव्यावर कार्यरत असलेले वन कर्मचारी तोड केलेले वृक्ष तुम्ही का उचलुन का आणले असे विचारणा करीत धमकी दिली. माझ्या रस्त्यात आले तर मुंडके उडवुन देईल असे बोलवुन शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत भादंवि कलम ३५३ ,३२३ , ५०४, ५०६ , ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एकीकडे मानव आणी जंगल सहसंबध जंगल वाढीसाठी स्थानिक लोकांचे जिवनमान उंचाविण्यासाठी वनविभाग विविध योजनांच्या माध्यमातुन पाऊल उचलत असतांना काही स्थानिक निघ्नसंतोषी मंडळी कडून विरोध आणी क्रूर भावनेने वन विभागास उत्तरे देतांना दिसुन येत आहे . सातपुडयातील वनजमिनी वरील नव्याने वृक्षतोड करून वनजमिनीच्या मिळवण्याच्या नांवाने वनजमीन आपल्या नावावर होइल, पट्टे मिळतील अशी चुकीची व खोटी समजुत स्थानिक राहणार्‍या बांधवांमध्ये आहे. तरी अशा खोटया गोष्टींना बळी पडून आपल्या जंगलातील वृक्षांची तोड करू नये असे आवाहन वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांनी स्थानिक रहीवाशी नागरीकांना केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने