तत्कालीन सरपंच,उपसरपंचांसह सदस्य आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल ! मजरेहिंगोणा येथील प्रकार

चोपडा – : तालुक्यातील मजरेहिंगोणा ग्रामपंचायच्या तत्कालीन सरपंच,उपसरपंचांसह सदस्य आणि तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराज अंतर्गत तत्कालीन सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी सन २०२२-२३ मध्ये पदावर कार्यरत असताना त्यांनी पोपट यादव पाटील पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे अनुक्रमे सन २००९,२०१३,२०१४,२०१९, मयत झालेले असताना त्यांच्या नावाने खोटे दस्ताएवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन २६ हजार १५७ रुपये काढून शासनाची दिशाभुल करुन शासनाकडून येणाऱ्या रकमेचा सरपंच, सदस्य, तसेच ग्रामसेवक यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh