निलगायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चा अपघात.

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – सुनसगाव – नशिराबाद रस्त्यावर गैबनशाह पिर बाबा दर्गा जवळच नशिराबाद कडून सुनसगाव कडे जात असताना अचानक रस्त्यावर निलगाय आल्याने या निलगायी ला वाचविण्याच्या प्रयत्नात महिंद्रा कंपनीची कार उलटली या कार ने या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या शेवग्याच्या झाडास जोरदार धडस दिली व कार शेतात फेकली गेली मात्र योग्यवेळी कार ची एअर बॅग उघडली त्यामुळे दोघांचा जिव वाचला. ही घटना दि २१ जुलै च्या रात्री ११:३० च्या दरम्यान घडली. घटना समजताच सुनसगाव येथील युवकांनी सहकार्य केले व कार मधील किरकोळ जखमींना जळगाव येथे पोहचवले असे येथील रोहिदास दिनकर पाटील यांनी सांगितले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh