चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव उर्फ ग.स.संस्थेचे माजी कार्यलक्षी संचालक व व्यवस्थापक एस्.आर.पाटिल हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर संस्थेचे प्रशासन अधिकारी व स्टाफ् सोसायटीचे सेक्रेटरी वाल्मिकराव साहेबराव पाटिल (मंगरूळकर) यांची संस्थेच्या व्यवस्थापक पदावर निवड झाल्याने त्यांचा स्टाफ् सोसायटीचे संचालक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी शाल श्रीफळ हारगुच्छं देऊन यथोचित सत्कार केला.व्यवस्थापक वाल्मिकराव पाटिल यांची नोकरी सुरू झाल्यापासुन त्यांनी लिपीक,रोखपाल,उपशाखाधिकारी,शाखाधिकारी,प्रशासन अधिकारी अशा पदांवर कर्तव्यदक्षपणे काम केल्याने त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार व्यवस्थापक पदावर नियुक्ती झाली आहे.
याप्रसंगी ग.स.चे लेखापाल शामकांत सोनवणे, रोखपाल महेश सोनवणे, एच्.ओ.चे सहकारी ज्ञानेश्वर बाविस्कर, इकबाल मिर्झा,प्रदीप पाटील, अमर देशमुख, विकास पाटिल, संजय साळुंखे, अमोल जोशी, दिनकर पाटिल, भगवान मिस्तरी,संजय जाधव, दिपक खैरनार,वैभवराज बाविस्कर (चोपडा) यांची उपस्थिती होती.