आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश, नर्सरीसह केजीचीही वयोमर्यादा ठरली

या मध्ये बऱ्याचदा आपली पाल्ये लवकरच शाळेत घातली जातात. नर्सरी असेल किंवा केजी असेल किंवा पहिलीतील प्रवेश असेल पालक आपल्या पाल्यास शाळेत घालण्याची घाई करतात. परंतु आता शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

लहान वयातच विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता सरकारी शाळा असो की खासगी सहा वर्षे पूर्ण होत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

यासाठी विद्यार्थ्यांचे वय कधीपर्यंत सहा वर्षे पूर्ण असावे याबाबत देखील माहिती मिळाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करून घेता येणार आहेत. ज्या बालकांची सहा वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनाच सक्ती पात्र तथा दाखल पात्र समजण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘आरटीई’नुसार अशा बालके शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल असेही सांगण्यात आले आहे.

असे असेल प्रवेशाचे वय

नर्सरीसाठी १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ – ३ वर्षे

ज्युनिअर केजीसाठी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० – ४ वर्षे

सिनिअर केजीसाठी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ -५ वर्षे

इयत्ता पहिलीसाठी १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ – ६ वर्षे