बुधगाव येथे सूर्यकन्येचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जळगाव –  मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून उगम पावणारी व जळगाव जिल्ह्याला आपल्या जलाने सुजलाम् सुफलाम् बनविणार्‍या सुर्यकन्या तापी नदीचा आज  जन्मोत्सव

अनादी काळापासून संपूर्ण जगाला प्रकाश आणि उर्जा देणार्‍या सूर्यनारायणाला जेव्हा स्वत:च्या अंगाचा दाह सहन होईनासा झाला तेव्हा त्याने ताप कमी करण्यासाठी तापीची निर्मिती केली, अशी आख्यायीका आहे. शनिची बहिण असलेल्या तापीचे स्नान करणे म्हणजे पाप नाश करणे अशी श्रध्दा आहे.अधिकमास, चातरुमास, कार्तिक महिना, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तापीस्नानाला फार महत्व आहे. चारधाम यात्रा केल्यानंतर तापी स्नान केले नाही तर यात्रा सफल होत नाही, असा उल्लेख पुराणांमध्ये व तापी महात्म्य अध्याय 78 मध्ये आहे. तापी किनारी सुमारे 180 च्या जवळपास पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत.

जन्मोत्सव निमित्ताने बुधगाव चे सुनीताबाई गुलाबराव साळुंखे यांनी तापी नदिवर जाऊन साडी, नारळ, इत्यादी पुजा करून कैलास महाराज यांच्या कडुन वरणभात बटि तापी मायला निवेदय देण्यात आले.व बुधगाव येथे जय श्री दादा धुनिवाले मित्र मंडळ करून भजनाचा व भाडाराचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज कोळी, हिरामण कोळी, सजनराव साळुंखे, प्रकाश साळुंखे, बन्सी नाईक, साहेबांवर पाटील, चुणामन कोळी, बाळु भिल, विनोद कोळी, दिपक बाविस्कर, निवृत्ती कोळी, आबा कोळी, चिंतामण शिरसाट, छोटु शिरसाठ, भुषण कोळी, आकाश भोई, सोनु नाईक, उदय शिरसाट आदी सहकार्य करणारी मंडळी उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh