भोकर – कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहिर झाली असून दि.२७ सोमवार पासून निवडणूक प्रक्रियेला सूरूवात झाली असून आहे.नामनिर्देशन पत्र भरावयाची शेवट ०३ एप्रिल नामनिर्देशन मागे घेण्याची शेवट २० एप्रिल २१ एप्रिल ला चिन्हांचे वाटप २९ एप्रिल मतदान ३०रोजी निकाल जाहीर होणार आहे.भोकर बाजार समिती निवडणूकित महाविकास आघाडी व शिंदे शिवसेना भाजप मनसे बिआरएस मैदानात उतरणार असल्याने चांगलीच रंगत पहावयास मिळणार आहे.नव्यानेच आलेल्या तेलंगणातील मूख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बिआरएस संबध नांदेड जिल्ह्यात पक्षाचे ध्येय्य धोरण व आपली विकासात्मक भूमिका मांडून शेतकरी शेतमजूरांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशिल असून अब कि बार किसान सरकार हा नारा घेवून भोकर बाजार समिती च्या निवडणूकीत उतरणार असून विविध पक्षातील कार्यकर्ते बिआरएस पक्षात जाहीर प्रवेश करुन यापूढे होणार्या निवडणूका लढवतील काँग्रेस पक्षापूढे हे एक नवे आव्हान उभे राहणार आहे हस्सापूर येथील प्रसिध्द शेतकरी उत्तम पाटील यांनी बाजार समितीची निवडणूक लढवणार आहेत. भोकर बाजार समितीवर बिआरएस चा झेंडा फडकणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.