ब्रेकिंग न्यूज ! कोश्यारींनंतर दोन महिन्यातच राज्यपाल रमेश बैंसही पदमुक्त होणार?

मुंबई – माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानतंर रमेश बैंस यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी वर्णी लागली. फेब्रुवारी महिन्यात रमेश बैस यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली होती.

पण दोन महिन्यातच रमेश बैस  हेदेखील पदमुक्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे.

याचं कारणही तसेच आहे. या वर्षाच्या अखेरील छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण छत्तीसगडमध्ये भाजपमध्ये खंबीर नेतृत्त्वाचा अभाव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये रमेश बैस यांना भाजपकडून संधी मिळू शकते.आगामी विधानसभेसाठी रमेश बैस यांना मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ दिली जाऊ शकते. अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रासह 13 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले होते. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारले होते. या जागांवर नवीन नियुक्त्याही करण्यात आल्या. महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात येण्यापूर्वी रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते.

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिला होता, जो राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. छत्तीसगडचे असलेले रमेश बैस हे भाजपचे मोठे नेते राहिले आहेत. ते सात वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. राज्यपाल होण्यापूर्वी ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh