बोदवड – वरणगाव रेल्वे लाईनवर अनोळखी मृतदेह ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव ते बोदवड दरम्यान अप रेल्वे लाईनवर आचेगाव रेल्वे स्थानका दरम्यान एका ३० ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळल्याची खबर वरणगाव रेल्वे स्टेशन चे उपप्रबंधक सतिषकुमार यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात दिली असता पोहेकाँ यासीन पिंजारी यांनी घटना स्थळी भेट दिली त्यानुसार अकस्मात मृत्यू ३०/२०२४ बी एन एस एस कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. सदर घटना दि १२ आँगष्ट रोजी रात्री ८:५० पुर्वी घडलेली असून अजूनही या अनोळखी चा तपास लागलेला नाही. वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ प्रमोद कंकरे तपास करीत आहेत.

ताजा खबरें