बोदवड बाजार समितीत भाजप शिवसेनेचा सुपडा साफ राष्ट्रवादीला १८ पैकी १७ जागांवर बहुमत

बोदवड – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतमोजणी बोदवड शहरातील अग्रसेन भवन येथे सकाळी साडेदहा वाजेपासून सुरू होते दरम्यान दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व गटांचे निकाल हाती आले असून, एकूण 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. शिवसेना(शिंदें)-भाजप गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आ.चंद्रकांत पाटील व आ.एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठापनाला लागली होती.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण ९४.५५%मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजे पासून मतमोजणी ला सुरवात झाली. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे उमेदवार जयपाल बोदडे यांनी मुसंडी मारत आगे कूच केली. दरम्यान ही एकमेव जागा शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांना प्राप्त झाली आहे. उर्वरित सर्व 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.या निर्णयामुळे बोदवड मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh