चिनावल नवनगर मित्र मंडळा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – चिनावल ता. रावेर येथील नवनगर मित्र गणेश मंडळातर्फे दरसाल प्रमाणे यंदाही यंदाही काल दि. 12 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या मंडळात मार्फत दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित करून समाजहित जोपासले आहे.

या वेळी सावदा पो. स्टे. चे एपीआय विशाल पाटील साहेब व पीएसआय अमोल गर्जे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी 81 जणांनी रक्तदान करुन समाज उपयोगी कार्याला हातभार लावला. हे शिबीर आरोग्य सेवा मेडिकल फाउंडेशन रेडप्लस ब्लड सेंटर जळगांव यांचे माध्यमातून भरत गायकवाड, आमोल शेलार यांनी उपस्थित राहून रक्तदान करून घेतले. या वेळी जिल्हा दूध संघाचे संचालक ठाकसेन पाटील, मंडळाचे अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष अमीत सरोदे, खजिनदार पवन पाटील, परेश महाजन, प्रतीक इंगळे, मयुर पाटील, लोकेश पाटील, प्रतीक पाटील, धीरज वारके, टिनेश पाटील, दुर्गेश पाटील, योगेश ठोंबरे, चेतन पाटील, कोमल वायकोळे, संकेत महाजन, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

ताजा खबरें