भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. अनेकदा त्यांनी पातळी सोडून शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे. मात्र रविवारी एका कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी थेट शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या त्या वक्तव्यांचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.
सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना पडळकर यांनी शरद पवार व रोहीत पवार यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना मस्ती आली आहे. ”तो मुख्यमंत्री होता, तो केंद्रात मंत्री होता. यावर्षी आला नाही’ अशा शब्दात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. सोलापुरातील मंद्रूप येथील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी रोहीत पवार यांचा माकड असा उल्लेख केला.