मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला लागणार ब्रेक

सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका वादग्रस्त विधानावरून टीकेचा सामना करत आहे. अशातच आता या यात्रेला ब्रेक लागणार आहे.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक होणार असून या बैठकीला राहुल गांधी यांची उपस्थिती गरजेची आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात दोन व्याख्याने देणार आहेत. ते 2 मार्चपासून पुन्हा प्रवास सुरू करणार असून राहुल गांधी 5 मार्चला महाकालेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. राहुल गांधी 26 फेब्रुवारीला इंग्लंडला रवाना होणार असून राहुल गांधी 2 मार्चपासून पुन्हा प्रवास सुरू करणार आहे.

कानपूरला पोहोचणार भारत जोडो न्याय यात्रा

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या यूपीमध्ये असून आज, या यात्रेचा 39 वा दिवस आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा मंगळवारी रात्री लखनऊमध्ये पोहोचली. त्याचवेळी आज ही यात्रा कानपूरला पोहोचणार आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 15 राज्ये आणि 110 जिल्ह्यांतून जाणार आहे. राहुल गांधींची ही न्याय यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ती 20 मार्चपर्यंत चालणार आहे.

15 राज्यांमधून जाणार यात्रा

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात मार्गे महाराष्ट्रात पोहोचणार आहे. या कालावधीत 6700 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.

राहुल गांधी कुठेतरी पायी तर कुठे बस किंवा अन्य वाहनांनी हा प्रवास पूर्ण करणार आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेले आणि या काळात त्यांनी 4000 किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास केला होता. हा प्रवास 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू होऊन 30 जानेवारी 2023 रोजी संपला.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh