पुणे Porsche कार अपघात प्रकरणात मोठी बातमी; आरटीओकडून अल्पवयीन आरोपीला ट्रेनिंग

पुणे – दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एक भीषण अपघात घडला होता, एका भरधाव अलिशान पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण-तरुणीला चिरडलं, या अपघातामध्ये या अभियंता असलेल्या तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीनं मुलगा चालवत होता. तरुण आणि तरुणीला उडवून पळून जाण्याच्या तयारीत असताना या तरुणाला जमावानं पकडलं, त्याला मारहाण करण्यात आली.

त्याला न्यायालयात हजर केलं असता तातडीनं जामीन मंजूर करण्यात आला, तसेच त्याला केवळ अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावण्यात आल्यानं हे प्रकरण चांगलंच तपालं, त्यानंतर या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले.

आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे या प्रकरणातील तरुणाला आरटीओकडून वाहन चालवण्याचे धडे देण्यात आले आहेत. त्याला रोड सेफ्टी ट्रेनिंग देण्यात आलं आहे. वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते या सारख्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. अल्पवयीन तरुणाला ड्रायव्हिंगचे धडे देताना प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे.

अल्पवयीन तरुणाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिण्यासोबतच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयसोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन देण्यात आला होता. त्यानं निंबंध सादर केला आहे, त्यानंतर आता त्याला आरटीओकडून रोड सेफ्टी ट्रेनिंग देण्यात आलं आहे.

ताजा खबरें