मुंबई – शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानं सध्या राष्ट्रवादीमध्ये नवा अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
मात्र दुसरीकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. राष्ट्रवादीनंही याचं खंडन केलं नसल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हणाले चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे.
यापूर्वी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठका केल्या आहेत. याचं राष्ट्रवादीकडून देखील कधी खंडण करण्यात आलं नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिले यावरून शंका घ्यायला वाव आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते बेळगावमध्ये बोलत होते.
चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात पुढे बोलताना ते म्हणाले की, 2014 मध्येच महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादीने 2014 मध्येच भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागला हे मान्य .
पण आम्हला देशभर याचे काही परिणाम होतात का याची चाचपणी करावी लागते. भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता राष्ट्रवादीच्या राजकीय बदलानंतदर अनेक जण काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असं चव्हाण यांनी म्हटलं.