मोठी बातमी; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

जळगाव – महायुतीने आज (मंगळवार) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात होते.

त्यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच हा अपघात झाला आहे.

ताजा खबरें