आता आई-वडीलच नाही तर सासू-सासरेही ‘या’ योजनेचा लाभ घेऊ शकणार; केंद्र सरकारकडून पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट

केंद्र सरकारच्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून  आनंदाची बातमी आहे. आता पुरुष कर्मचारी देखील केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत त्यांचे आई-वडील आणि सासरच्या लोकांना लाभार्थी बनवू शकतात.

यापूर्वी ही सुविधा फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. या नव्या आदेशानंतर महिला आणि पुरुष केंद्रीय कर्मचारी या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मोदी सरकारची ही योजना नेमकी काय आहे आणि केंद्र सरकारचे पुरुष कर्मचारी त्याचा कसा फायदा घेऊ शकतील याविषयी जाणून घेऊयात.

योजना नेमकी काय आहे?

आयुष्मान भारत प्रमाणे CGHS ही देखील भारत सरकारची एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे. याअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात रुग्णालयात उपचारांचा लाभ मिळतो. CGHS अंतर्गत कर्मचार्यांना विशेष उपचार, औषधे आणि मोफत आरोग्य तपासणी यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा खर्चही कमी होतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाते.

नवीन आदेशानंतर काय बदल झाले?

या नवीन अधिसूचनेसह, पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील किंवा सासू-सासरे यांना CGHS चे लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्याची संधी मिळाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा सासरचे लोक त्यांच्याबरोबर राहतात आणि त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, त्यांच्यासाठीही ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. यामुळे कौटुंबिक अभ्यासाची काळजी घेण्यास आणि भविष्यातील चिंता कमी करण्यास देखील मदत होईल.

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?

केंद्र सरकारच्या CGHS या आरोग्य योजनेचा लाभ महिलांबरोबर पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी, विद्यमान आणि माजी खासदार, माजी राज्यपाल आणि स्वातंत्र्य सैनिक, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे वर्तमान आणि माजी न्यायाधीश, केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त पत्रकार, दिल्लीतील कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलीस, रेल्वे बोर्ड कर्मचारी आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेत उपलब्ध सुविधा

या योजनेच्या लाभार्थ्यांना ओपीडीमधील उपचार आणि औषधांचा खर्च, शासकीय रुग्णालयातील उपचार सुविधा, कृत्रिम अवयवांसाठीचा खर्च, खासगी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत खर्च होणारा पैसा, इत्यादींचा लाभ मिळतो.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित