भुसावळ तालुका पोलिसांनी २४ तासात केला कुऱ्हा पानाचे येथील खूनाचा उलगडा !

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे झालेल्या रखवालदार खून प्रकरणाचा तपास अवघ्या २४ तासात उलगडा केल्याने भुसावळ तालुका पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

या बाबत माहिती अशी की, संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सदाशिव राजाराम डहाके हा कुऱ्हा पानाचे येथील अण्णा शिंदे यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होता त्याचे कुऱ्हा पानाचे येथील खळ्यात वास्तव्य होते. दि.१४ फेब्रुवारी रोजी दिपक पितांबर पाटील हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या खळ्याच्या बाजूला असलेल्या अण्णा शिंदे यांच्या खळ्यामध्ये दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना सदाशिव राजाराम डहाके हे पलंगावर झोपलेले दिसले. त्यांनी त्यांना आवाज देऊन उठवले असता ते उठले नाहीत ते मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिपक पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन ला दिलेल्या खबरी वरुन पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

परंतु शवविच्छेदन अहवालात मृतदेहात अंतर्गत जखमा असल्याचे समजल्यावर तसेच मारहाणीची माहिती ही पोलीसांना मिळाली. या बाबत मोंढाळा ता भुसावळ येथील दूध विक्रेता अनिल संतोष धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात लक्ष्मण गणेश शिराळे रा. शेलवड ता बोदवड याच्या बाबत माहिती मिळाली. तो पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्यास मोंढाळा येथून शिताफीने अटक करण्यात आली. जून्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबनराव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोऊनि पूजा अंधारे, एक एस आय विठ्ठल फुसे, पोहेकाॅ संजय तायडे, युनूस शेख , प्रेमचंद सपकाळे, दिपक जाधव, वाल्मिक सोनवणे, आत्माराम भालेराव, रियाजोद्दीन काझी, पोना कैलास बाविस्कर, जितेंद्र साळुंखे, पोकाॅ उमेश बारी, रशिद तडवी यांनी केली. २४ तासात खूनाचा उलगडा झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी भुसावळ तालुका पोलीसांचे कौतुक केले आहे.