बापलेकाचा अजब दावा! ‘अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर पोर्शे चालवत होता’

मुलासह गाडीत असलेल्या दोन मित्रांची व त्यांच्या पालकांचीही चौकशी होणार

पुणे : पुण्यातील कार अपघातप्रकरणीरोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच ज्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडलं तो वेदांत अग्रवाल व त्याचा धनिक बाप आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल  या प्रकरणी पोलिसांना भरटकवत असल्याचे समोर येत आहे. काल अग्रवालांच्या वकिलांनी पोर्शे कार बिघडली होती व त्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती असा दावा केला. पण त्यामुळे बिघडलेली कार वडील आपल्या मुलाला का चालवायला देतील? असा साहजिक प्रश्न उपस्थित झाला. यानंतर आता बापलेकाने ती कार अपघाताच्या वेळी आमचा फॅमिली ड्रायव्हर चालवत होता, असा दावा केला आहे. तर ड्रायव्हरने मात्र याच्या परस्परविरोधी जबाब नोंदवला आहे.

काल झालेल्या सुनावणीत ड्रायव्हरने आधीच ही कार आपल्याला विशाल अग्रवाल यांनीच मुलाकडे चालवण्यासाठी दे, असं सांगितल्याचा दावा केला होता. मुलगा कोझी पबमधून आपल्या दोन मित्रांसह पार्टी करुन परतल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नव्हता, त्यामुळे ड्रायव्हरने त्याच्या वडिलांना फोन करुन हे कळवले. मात्र, त्याच्या वडिलांनीच मुलाला कार चालवू देत असं सांगितल्याने ड्रायव्हरचा नाईलाज झाला आणि त्याने कार चालवायला दिली, असा जबाब ड्रायव्हरने नोंदवला आहे.

यानंतर आता बापलेकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मुलगा नाही तर अपघाताच्या वेळी ड्रायव्हरच गाडी चालवत होता, हा जबाब गोंधळवून टाकणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेल्या मुलाच्या दोन मित्रांची व त्यांच्या पालकांचीही चौकशी केली जाणार आहे. या दोन्ही मित्रांना पालकांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं आहे. यात हे सगळे कुठे गेले होते?, पार्टीत काय केलं?, परत येताना नक्की कोण होतं?, गाडी कोण चालवत होतं? या सगळ्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांची देखील चौकशी होणार

या प्रकरणी आता पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या मार्फत नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल. दोन-दोन एफआयआरची नोंदणी का करण्यात आली? यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का? त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी नेमकी कधी झाली? या सगळ्याचा तपास या पथकाच्या माध्यमातून केला जाईल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने