आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीत जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी

जळगाव –  घटकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन) नोंदणी जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यात एकाच दिवसात दहा हजाराच्यावर लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून या नोंदणीत जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.

देशात आयुष्यमान भारत कार्ड मोहीम राबविण्यात येत आहे. देशातील गरीब जनता व शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सेवा प्रभावीपणे पोचण्यासाठी उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमात अधिक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले.

ग्रामीण भागात जोरदार मोहीम

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा मोठ्याप्रमाणावर कामाला लागली आहे. सध्या राज्यभर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचे अभियान राबवण्यात येत आहे.

मोहिमेत जिल्हा परिषद अंतर्गतच्या ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी (ता. ३१) जिल्ह्यात दहा हजार २९५

ताजा खबरें